G-Max Soyabean Seed KDS-992
* हे मध्यम कालाधीत येणारे वाण असून ९५ ते १०० दिवसांत परिपक्व होते.
* उंची किमया व संगम यांच्या तुलनेत थोडी कमी दिसून येते. (१.५ ते २ फुटांपर्यंत)
* पानाचा आकार थोडा त्रिकोणी, फिक्कट हिरवा व चार पानाचे प्रमाण मध्यम. ३ पानांची संख्या जास्त प्रमाणात असून, पाने थोडी वरती वाढलेली दिसतात. खोडावर व शेंगावरही थोड्या प्रमाणात केस असतात.
* उंची कमी व खोडाची जाडी जास्त असली तरी दोन फांद्यातील अंतर कमी आणि दोन इंटरनोडमधील अंतरही कमी असल्यामुळे एकुण फांद्यांची संख्या जास्त राहते. तसेच एका ठिकाणी शेंगांची संख्या ५ ते ६ (म्हणजे इतर वाणांच्या तुलनेत जास्त) दिसून येते. एकुण शेंगांचे प्रमाण वाढते.
* तांबेरा रोग व खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम.
* योग्य व्यवस्थापनात अतिशय चांगले उत्पादन देते.
* हेक्टरी सरासरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते
Subscribe to get information about products and coupons